Tuesday, November 19, 2024

शिकलेली आई, संकटात नेई!


गेल्या काही वर्षांत मुलींचं शिक्षणा(?)चं प्रमाण वाढलं ही 'तशी बरी' गोष्ट आहे. अनेक जणी घराबाहेर 'पडून' पैसे कमावतात, नवऱ्याला प्रपंचात 'आर्थिक' सहाय्य करतात ह काही वाईट नाही. पण वाईट हे आहे की या तथाकथित शिकलेल्या बायका समाज माध्यमात वाचून/पाहून आपलं मत बनवितात आणि त्यांच्या मते अशिक्षित सासू-सासरे(आणि आईवडील देखील) यांनी सांगितलेलं सगळंच चुकीचं समजतात.त्यांच्या 'अपूर्व' ज्ञानापुढे त्यांना आईवडिलांचं, सासू-सासऱ्यांचं 'अनुभवसिद्ध' पारंपरिक ज्ञान फिकं वाटतं. आणि इथच आपल्या अपत्याचं भविष्य उज्ज्वल बनवायचं म्हणून संकटात नेतात.