Friday, August 22, 2025

श्राद्ध: एक विज्ञान!

(अस्विकरण: मी कुणी शास्त्रज्ञ(शास्त्री), वैज्ञानिक नाही. मी फार मोठा 'विद्लानही नाही. त्यामुळे माझे विचार (कु) तर्काच्या कसोटीवर तपासू नयेत).
सामान्यत: श्राद्ध वर्षातून दोन वेळा केली जातात. व्यक्तिगत श्राद्ध हे मृत व्यक्तीच्या चांद्रमासातील तिथीला केलं जातं तर महालय श्राद्ध हे सामान्यतः भाद्रपद/आश्विन कृष्ण पक्षात केलं जातं(याविषयी अधिक माहिती आपल्याला 'धर्म'शास्त्रज्ञ सांगतील).
आता वळूया विषयाकडे. तर अनैकांना श्राद्धविधीविषयी (कु)शंका असतात की जर मृतात्मा वेगळ्या लोकांत असैल तर इथं जनांना जेवायला घालून त्यांच्यापर्यंत पोचत कसं! ज्यांना मृतात्म्याच्या नावाने वाढलं जातं त्यात ते कसे येतात(बऱ्याच वेळा पुरोहितच या वेडगळ समजुतीला मोठं करतात).पुरोहितांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी 'शोधून काढलेला' विधी तर नाही ना! इ.
आता या शंकांची उत्तरं! तर जनांना वाढलेलं अन्न मृतात्म्यांस मिळत नाही. तर श्राद्धविधीचं पुण्य त्यांना मिळतं. अर्थात ज्यांना मृतात्म्यांच्या नावाने वाढलं जातं ते त्या जनांत येण्याचा प्रश्नच नाही. पुरोहितही केवळ श्राद्ध कसं करावं एवढंच सांगत नाहीत. त्यांनाही अनेक मार्ग आहेत उदरनिर्वाहासाठी! शिवाय सर्व पूजापाठात अनेक प्रकारच्या साहित्याची आवश्यकता भासते. त्यामुळे अनेकांना व्यवसाय मिळाले आहेत(यावर राजिवजींचं(मल्होत्रा नव्हे, दिक्षित!)छान व्यायाम आहे.
तर एकूण निष्कर्ष असा आहे श्राद्ध विधी एक विज्ञान आहे.
लक्षपूर्वक आणि शांतपणे वाचणाऱ्यांचे आभार आणि त्यांना धन्यवाद!

Thursday, August 21, 2025

हिंदू धर्म आणि 'बामनी' हस्तक्षेप!

खरं तर हिंदू(त्व) हे धर्म नसून एक 'जाती' आहे. ज्याला हिंदू धर्म म्हटलं जातं तो 'विकृत' सनातन धर्म आहे. पण सध्या हिंदू धर्म हा शब्द प्रचलित असल्याने मी तोच वापरत आहे.
हिंदू धर्मात जे काही वाईट होतं, आहे(अधर्मी, अधर्मइच्छक, साम्यवादी आणि फुरोगाम्यांच्या) मते त्याचं खापर येऊन फुटतं ते बामनावर! मग ते रचणारा किंवा लिहीणारा बामन असो वा नसो! मनुस्मृतीचंच घ्या ना! मनू हा राजा होता आणि राज्यकारभार व्यवस्थितरीत्या चालावा म्हणून जो ग्रंथ रचला तो मनुस्मृती! अलिकडे तर काय, हिंदू आणि ब्राह्मण(बामन) वेगळे आहेत असा भन्नाट शोध लावणारे महाभाग/गा समाजमाध्यमांत आढळतात. एकीकडे तर मी वाचलं की यज्ञवंशिय वैदिक ब्राह्मणांनी नाग म्हणून मातीच्या प्रतिकृतीची पूजा करायला सुरुवात केली. यांचं इतिहासाचं एवढे 'अपूर्व' ज्ञान बघून मी तर थक्क झालो. खरं तर मूर्तिपूजा हा मूळ वसनातन धर्माचा भाग नव्हे, ती नंतर सुरू झाली. आणि यज्ञ म्हणजे केवळ होमहवन नव्हे. समाज हितासाठी केलेलं कोणतंही काम यज्ञ असतं. अर्थात 'विज्ञानशास्त्रीय'होमहवन हे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक आहे यात शंका नाही.पण यज्ञ या शब्दाचा अर्थ संकुचित घेणे योग्य नाही.