Sunday, May 17, 2026

भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलाय हिंदुस्थान!

मुघल आणि इंग्रज हिंदुस्थानात साम्राज्य स्थापन करू शकले कारण राजे आणि 'मंत्र्या'तील (छद्म)धनाचा लोभ अति झाला. त्यांची राज्य हिंदुस्थानात आता नसली तरी हिंदूतील लोभ नष्ट झाला नाही. त्यामुळेच सर्वत्र भ्रष्टाचार अधिक बोकाळला. आज तर एवढा भ्रष्टाचार वाढला आहे की कुणावरही चांगलं आहे असा विश्वास ठेवला की तेच तुमचा विश्वासघात करतात.
भ्रष्टाचार म्हटलं की आमच्या(सामान्य बुद्धीच्या जनांच्या) डोक्यात केवळ लाचलुचपत किंवा कर चुकवेगिरी येतात(किंवा शासकीय योजनांत मिळालेल्या वस्तू ढापणं). पण भ्रष्टाचार शब्द भ्रष्ट+आचार असा आहे. तुम्ही जर एखादी वस्तू विकत असाल आणि त्यात नसलेल्या गोष्टी आहेत म्हणून सांगणं किंवा असलेल्या हानिकारक गोष्टी(उदा. मैदा, चरबी द्रव्यसंरक्षक) न सांगणं हा ही भ्रष्टाचार आहे. आज अनेक आस्थापनं आपल्या उत्पादनात मैदा किंवा चरबी नाही म्हणून विज्ञापन करतात. पण त्यासोबत मैदा/चरबीयुक्त उत्पादनंही आणतात हा ही एक नियमांत बसणारा भ्रष्टाचार आहे.  एकूणच आपण भ्रष्टाचार व लोभाच्या तसेच (छद्म) विकासाच्या मोहाच्या विळख्यात अडकलो आहोत.
मी एकट्याने करून काय होणार!
आपल्या देशातील बहुतांश माणसं असाच विचार करतात. केवळ मी एकट्याने धर्माचरण करून काय होणार किंवा मी एकट्याने सत्यानं वागून काय होणार हेच नाही तर बचत संयम याबाबतही ते असंच 'थिंकतात'.पण कुणी तरी एकट्याने पुढाकार घेतल्याविना बदल होत नाही(म्हणून मी ठरवलं आहे, कुणी काही म्हणो, आपण सत्य-धर्म यांना सोडायचं नाही). छत्रपती शिवाजी महाराज, जनमान्य टिळक जन्मले नसते तर आपण विदेशी, विधर्मींच्या जोखडातून मुक्त झालो नसतो.
जय भारत, जय महाराष्ट्र, जय उत्तर भारत(प्रदेश)!

अध्यात्म आणि तर्कशास्त्र(भाग ३:अनादी-अनंतत्व)

(मागील:अध्यात्म आणि तर्कशास्त्र(भाग २: पुनर्जन्म https://hemantgore1978.blogspot.com/2026/04/blog-post_20.html)!अध्यात्मशास्त्र आपल्याला सांगतं की ईश्वर/ब्रह्म किंवा परमात्मा अनादी अनंत आहे. जैवविकासवाद(इवोलुशन थेरी)नुसार काही करोड वर्षांपूर्वी पहिला जीव निर्माण झाला. पण मग त्यापूर्वी काही तरी असेलच ना! समजा हे जग नष्ट(?) झालं. पण मग त्यानंतर काही तरी असेलच ना! तेच ईश्वर किंवा ब्रह्म किंवा परमात्मा!

Monday, April 20, 2026

अध्यात्म आणि तर्कशास्त्र(भाग २: पुनर्जन्म)!

(मागील: अध्यात्म आणि तर्कशास्त्र भाग१
https://hemantgore1978.blogspot.com/2026/04/blog-post.html)
पुनर्जन्म हा एक अध्यात्माचा महत्त्वाचा सिद्धांत आहे. जीव पुन्हा पुन्हा जन्म घेतो असं अध्यात्मशास्त्र सांगतं. आणि ते खरं आहे कारण आधुनिक सांख्यविज्ञानाचा सिद्धांत आहे की चेतन्य निर्माण होत नाही की नष्टही होत नाही केवळ त्याचं स्थानांतरण आणि रुपांतरण होतं. मग मला सांगा, मृत्यूनंतर जीवरुपी चैतन्य कुठं जातं आणि जन्मावेळी ते कुठून येतं! याचाच अर्थ पुनर्जन्म असला'च' पाहिजे. पुनर्जन्म आहे हे यावरून सिद्ध होतं.
पुढील:अध्यात्म आणि तर्कशास्त्र(भाग ३:अनादी-अनंतत्व)
https://hemantgore1978.blogspot.com/2026/05/blog-post.html

Sunday, April 19, 2026

अध्यात्म आणि तर्कशास्त्र(भाग १: प्रस्तावना)!

अध्यात्म आणि तर्कशास्त्र(भाग १: प्रस्तावना)!
एकदा सह्याद्री की मुंबई दूरदर्शन वाहिनीवर असलेल्या वाद-संवाद कार्यक्रमात नऱ्या‌ म्हणाला होता की अध्यात्म म्हटलं की मला हसू येतं कारण अध्यात्म म्हटलं की पुनर्जन्म वगैरे आलं. पण अध्यात्म हे तेवढंच नाही. ते एक 'परिपूर्ण' विज्ञान आहे.अध्यात्म म्हणजे केवळ मंदिरात जाणं, प्रदक्षिणा घालणं, पूजा-पाठ किंवा होम-हवन, परोपकार करणं नव्हे, तो अध्यात्माचा एक छोटासा भाग आहे. अध्यात्म हा शब्द अधि+आत्म मिळून बनला आहे.म्हणजे शब्दार्थाने आत्म्याचं अधिष्ठान आहे जिथे ते अध्यात्म हा अध्यात्माचा साधा-सोपा सरळ अर्थ आहे.
(पुढील अध्यात्म आणि तर्कशास्त्र: भाग २
https://hemantgore1978.blogspot.com/2026/04/blog-post_20.html

Sunday, October 5, 2025

हिंदू तो तुम हो ही

हिंदू तो तुम हो ही
'सच्चा' मनुष्य बनना।
सनातन की राह पकड़के
'भारतभक्त' है बनना।।ध्रु।।
करना न हो तुम्हें तो
तो मत कर मूर्तिपूजा।
(सच्चे)आत्मा से अपने
बड़ा भगवान न दूजा।।
बुद्धिवाद के नाम पर परंतु
पाखंड ना चलाना ।
सनातन की राह पकड़के
भारतभक्त है बनना।।१।।
ना इर्ष्या कर किसी से
द्वेष किसी का न करना।
सच्चिदानंद से तुम
वंचित रहोगे वरना।।
मानवता के (सच्चे) विकास की
राह तुम्हें है पकड़ना।
सनातन की राह पकड़के
भारतभक्त है बनना।।२।।
भक्त तुम बनना अवश्य
परंतु राजदास(गुलाम)ना बनना।
मिले रोटी(और बेटी) इसलिए
'चाटुकारी' न करना।
कम हो जिंदगी परंतु
स्वाभिमान से है जीना।
सनातन की राह पकड़के
'भारतभक्त' है बनना।।३।।

Monday, September 22, 2025

ओळख षड्रिपूंची: मत्सर

(भारतीय तत्वज्ञानात जीवमात्रांमधे असणारे षड्रिपू(सहा शत्रू) सांगितले आहेत. त्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न मी या लेखमालेत करणार आहे).
भारतीय तत्वज्ञानात सांगितलेल्या षड्रिपूत ६वा आहे मत्सर! मत्सर म्हणजे असूया, इर्षा! दुसऱ्याचं चांगलं झालेलं न बघवणं. सवतीमत्सर प्रसिद्ध आहेच. मत्सर इतरांची हानी कमी आणि स्वतःची(ज्यात असतो) जास्त करतो. दुर्योधन हे मत्सराचं एक उदाहरण आहे.
यला वाटतं इतकं पुरेसं आहे.
लक्षपूर्वक वाचणाऱ्यांचे आभार आणि धन्यवाद!

Sunday, September 21, 2025

ओळख षड्रिपूंची: मद

(भारतीय तत्वज्ञानात जीवमात्रांमधे असणारे षड्रिपू(सहा शत्रू) सांगितले आहेत. त्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न मी या लेखमालेत करणार आहे).
भारतीय तत्वज्ञानात सांगितलेल्या षड्रिपूत ५वा आहे मद! मद म्हणजे (दु:)अभिमान, गर्व, अहंगंड. मदामुळे आपण इतरांपेक्षा फार मोठे पराक्रमी किंवा धनिक किंवा बुद्धिमान आहोत असा भ्रम होतो. मदामुळे रावणाच्या कुळाचा नाश झाला. दुर्योधन,कर्ण आ मारले गेले 
यला वाटतं इतकं पुरेसं आहे.
लक्षपूर्वक वाचणाऱ्यांचे आभार आणि धन्यवाद!