हिंदुस्थानात पुष्कळदा स्त्रियांचे कपडे आणि बलात्कार यावर चर्चा होत असतात. तथाकथित स्वयंघोषित संस्कृतीरक्षक सारा ठपका स्त्रियांच्या कपड्यावर ठेवतात तर तथाकथित स्वयंघोषित स्त्रीवाद्यांना तो त्यांच्या(स्त्रियांच्या) व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला वाटतो पण दोघेही चुकीचाच विचार करतात(कसं ते खाली स्पष्ट करत आहे)
मैथुनेच्छा(सेक्सची इच्छा) ही मानवांसहित सर्व प्राण्यांची प्रकृती आहे पण त्यातून दुसऱ्याला दु:ख देऊन 'आपलाच काम' पुर्ण करणं ही झाली विकृती. तर आपल्या 'जोडीदाराला' आनंद देणं('कुणाला 'धोका' न देता) ही झाली संस्कृती. यासाठीच विवाह संस्था निर्माण करण्यात आली आणि कपड्यांचे शिष्टसंकेत निर्माण करण्यात आले. पण तरीही महिलांवर बलात्कार होतच राहिले. मानवी नरातील विकृती वाढतच राहिली(यात चलतचित्र निर्मात्यांनी बलात्कार हा जणू काही पराक्रम आहे अशा पद्धतीनं दृष्ये चित्रीत करुन 'मोलाची' भर घातली. ही झाली एक बाजू.
याची दुसरी बाजू ही की जरी कपडे पूर्ण आणि व्यवस्थित असले तरी बलात्कार होतात हे जरी खरं असलं तरी उत्तानक आणि मादक कपडे घातल्याने सत्पुरुषा़ंच्या मनातही दुर्वासना निर्माण होते. नराधमांना एक सबब मिळते. त्यामुळे स्त्रियांनी योग्य कपडे परिधान करणं हे त्यांसाठीच चांगलं.
Sunday, August 16, 2020
कपडे आणि बलात्कार!
Thursday, August 13, 2020
श्रमसंकार आवश्यक!
जन्मना जायते क्षूद्र, संस्कारात द्विजोच्चते असं एक शास्रवचन आहे. याचा शब्दशः अर्थ आहे कोणत्याही जातीत जन्माला आलं तरी आपण जन्मतः क्षूद्रच असतो, संस्कारांनी आपला दुसरा जन्म होतो. किती सुंदर आणि चांगलं वाक्य आहे हे!
तसे आपल्यावर कळत नकळत संस्कार होतच असतात पण मला आज प्रामुख्यानं लिहायचं आहे ते (शारिरीक)श्रमसंस्काराबद्दल.
सिंधुस्थानात पूर्वी विद्यार्थी गुरुघरी राहून विद्यार्जन करायचे, गुरुसेवा आवश्यकता होती त्यामुळे आपसूकच शारिरीक श्रम व्हायचे, (शारिरीक)श्रमांची सवय लागायची पण इंग्रजांनीं नियोजन आणि 'परिश्रमपूर्वक' गुरुकुलं नष्ट केली, 'भारतीयत्व' नसलेली 'लेखापाल' उत्पादक 'मेकाल्ले' शिक्षणपद्धती दृढ केली आणि आम्ही मानसिक दास बनलो. आम्हाला शरीरश्रम करणं कमी बुद्धिमतेचं वाटू लागलं(खेळण्याला मी श्रमात गणत नाही आहे). शेतात काम करणं कमीपणाचं वाटू लागलं. आपल्या अपत्यांना 'आयतं' मिळवून देण्यात धन्यता वाटू लागली आणि इथंच सगळी गडबड झाली. बालपणी (शारिरीक)श्रमांची सवय न लागल्याने ज्या़ना 'पांढरपेशी' चाकऱ्या मिळाल्या नाहीत अशा माझ्यासारख्यांना शरिरश्रम करणं फारच अवघड जाऊ लागलं
पण झालं ते झालं. आतातरी माझ्या अपत्यवान मित्रमैत्रिणींनी आपल्या अपत्यांना श्रमसंस्कार देऊन उपकृत करावं ही मित्रत्वाच्या नात्यानं कळकळीची नम्र विनंती.
शेवटपर्यंत वाचणाऱ्यांचे आभार, धन्यवाद!
जयतु जयतु सिंधूराष्ट्र!
ब्रम्ह सत्यं, जगं मिथ्या!
कुठंतरी थोडंसं सांख्य(science) जाणणारे काही 'अपूर्व' ज्ञानी स्वत: फार मोठं वैज्ञानिक असल्याचं भासवितात(तसा प्रयत्न करतात). आणि शंकराचार्यांनी मांडलेल्या 'ब्रम्ह सत्यं जगं मिथ्या' या सिद्धांताची खिल्ली उडवितात. परंतु या 'अपूर्व' ज्ञानीनांही कधीतरी याची प्रचिती येतच असते पण 'केवळ मीच(तेच)' ब्रम्ह असा समज असलेले ते 'अपूर्व' ज्ञानी ते मान्य करत नाहीत.
आता काहींचा प्रश्र्न असेल ब्रम्ह जर आहे तर ते दिसत का नाही! याला उत्तर आहे माया. माया म्हणजे जे 'सत्य' लपवते आणि 'मिथ्या(असत्य नव्हे)' सत्य म्हणून भासविते. हिच्या प्रभावामुळे आपण 'मिथ्या संसारात(पैसा, पद, आभासी प्रतिष्ठा इ.)' सुख मानतो आणि त्यालाच सर्वकाही समजतो आणि त्यामुळेच 'सच्चिदानंदघन परमात्मा प्राप्तीच्या
सुखाला मुकतो.
(विशेष तळटीप: मला अध्यात्मात आस्था आहे याचा अर्थ असा नाही की मला विज्ञान, तर्कशास्त्र मान्य नाही. माझा 'तथाकथित साईबाबा' करत असलेल्या किंवा स्वामी समर्थ, टेंबे स्वामी गजानन महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती यांच्या नावावर खपविल्या जाणाऱ्या चमत्कारांवर विश्वास नाही. त्यातील तर्कसंगत असेल त्यावरच माझी 'श्रद्धा' आहे.)
शेवटपर्यंत वाचणाऱ्यांना आभार, धन्यवाद!
जयतु जयतु 'सिंधूराष्ट्र'!
Friday, August 7, 2020
साबुदाणा और दही, शाकाहार नहीं|
साबुदाणा ये पदार्थ भारतीय नहीं है| ये तो अंग्रेजोंका आविष्कार है| इसका शरिरको कोई लाभ नहीं है| और ये शाकाहार भी नहीं है|
ये सच है की साबुदाणा पौधौसे बनाया जाता है लेकीन इसको बनाते समय बहोतसे किडे आकर उसमे पडते है| इसकेसिवा साबुदाणा बनता नहीं है| अब भी आपको लगता है क्या साबुदाणा शाकाहार है|
अब बात दहींकी| ये किसको मालूम नहीं है दही दूधसे बनता है| और दूध तो किसी पेडको नहीं लगता| अबभी आप कहेंंगे क्या दही शाकाहार हे!
कुल मिलके चार पंक्तियोमे
साबुदाणा और दही
शाकाहार नहीं|
उपवास इससे करना
कितना सही!साबुदाणा और दही, शाकाहार नहीं|
साबुदाणा ये पदार्थ भारतीय नहीं है| ये तो अंग्रेजोंका आविष्कार है| इसका शरिरको कोई लाभ नहीं है| और ये शाकाहार भी नहीं है|
ये सच है की साबुदाणा पौधौसे बनाया जाता है लेकीन इसको बनाते समय बहोतसे किडे आकर उसमे पडते है| इसकेसिवा साबुदाणा बनता नहीं है| अब भी आपको लगता है क्या साबुदाणा शाकाहार है|
अब बात दहींकी| ये किसको मालूम नहीं है दही दूधसे बनता है| और दूध तो किसी पेडको नहीं लगता| अबभी आप कहेंंगे क्या दही शाकाहार हे!
कुल मिलके चार पंक्तियोमे
साबुदाणा और दही
शाकाहार नहीं|
उपवास इससे करना
कितना सही!