Thursday, June 18, 2020

'स्वयंपूर्ण' 'भारत'!

मला आत्मनिर्भर या शब्दाचा नेमका अर्थ माहित नाही. पण मी जेवढं नरेंद्रजींना जाणतो त्यावरून त्यांना 'स्वयंपूर्णताच' अभिप्रेत असावी.
पुष्कळ जणांना वाटतं तेवढं स्वयंपूर्णता सोपी नाही. त्यासाठी लोभ-मोह त्यागाची आवश्यकता आहे. आपण कोणतीही गोष्ट विकत घेऊ शकतो म्हणजे 'स्वयंपूर्णता' नव्हे. आपल्या व्यक्तिगत आणि राष्ट्रीय आवश्यकता जेव्हा 'आपल्याच देशात', 'आपल्याच विचारांनी, 'आपल्याच माणूस-प्राण्यांकडून' पूर्ण होतील(जसं विदेशी आक्रमक येण्यापूर्वी होतं) तेव्हाच आपण स्वयंपूर्ण झालो असं म्हणता येईल. पण हे एवढं सोपं नाही. त्यासाठी 'मानसिक दास्यता(गुलामगिरी)' झुगारून द्यायला हवी. गुरुकुल-ऋषी परंपरा पुन्हा सुरू व्हायला हवी. कॉंन्व्हेंटमधील आपल्या कार्ट्यांना गुरुकुलात पाठवायला हवं(पण गुरुकुल म्हणजे केवळ वेद घोकून घेणारी रहाता कमा नयेत. त्यात ज्ञान-विज्ञान, कृषी, स्व/राष्ट्र संरक्षण विद्याही मिळायला हव्यात.

No comments: