Thursday, August 22, 2024

सापेक्षता आणि अद्वैत

आईनस्टाईननं सापेक्षतावाद मांडला. पण त्यापूर्वी(?) कित्येक वर्षे आद्य(?) शंकराचार्यांनी अद्वैताचा सिद्धांत मांडला. हे दोन्ही आपल्याला 'पदोपदी' जाणवतात पण आपल्या लक्षात येत नाही(तसंही 'जीवनात' यांचा फार काही 'उपयोग' होत नाही)
आता सापेक्षतावाद म्हणजे काय! तर विश्व हे सापेक्ष आहे.समजा आपण 'निर्व्याध' आहोत. मग आंबा हे आपल्यासाठी अन्न आहे. तो आंबा खाल्ला की त्याचा काही भाग पचून शरिरात मिसळतो. तर काही भाग गू म्हणून टाकला जातो. आता जर तो आपण 'डुकरांच्या' पुढ्यात टाकला तर ते त्यांचं अन्न होतं. तेच खड्यात पुरला तरी सूक्ष्म अशा जीवाणूंचा अन्न होतं. पण आपल्या करिता मात्र तोपर्यंत ते गूच असतं. म्हणजे काय सापेक्ष असतं.
दुसरं उदाहरण! मी हे टंकित करत आहे तीथं आता पहाट होत आहे. पण अमेरिकेत आता रात्र/सायंकाळ होतं असणार. म्हणजे हेही सापेक्ष आहे. थोडक्यात काय तर विश्वातील प्रत्येक गोष्ट सापेक्ष आहे.
अद्वैत म्हणजे काय तर ब्रह्म सत्य आणि जग मिथ्या. अनेक मूर्ख तथाकथित (भागवत)कथाकार मिथ्या म्हणजे अस्तित्वातच नसलेल्या गोष्टी असं समजतात. पण मिथ्या म्हणजे सत्य(शाश्वत) नसलेलं! 'अ'सत्य नव्हे. हे समजण्यासाठी 'मूळ' शंकराचार्यांचीच प्रज्ञा हवी. नुसती 'पोपटपंची' करून उपयोग नाही.
एवढं वाचल्यानंतर तुम्हा सुज्ञांच्या लक्षात आलंच असेल की सापेक्षतावाद आणि शंकराचार्यांचा अद्वैत सिद्धांत या एकाच  नाण्याच्या दोन बाजू आहेत.

No comments: