Monday, January 20, 2020

धर्मवेडा(?) औरंगजेब!

औरंगजेब कट्टर मुसलमान होता आणि केवळ मुसलमान झाला नाही म्हणून संभाजीराजांना मारलं असा एक अपसमज हिंदू समाजात निर्माण केला गेलाय. औरंगजेब कट्टर मुसलमान होता हे खरं आहे पण संभाजीराजांना मुसलमान बनविण्याचा त्याचा आग्रह का यासाठी इस्लाम समजून घेणं आवश्यक आहे. आणि इस्लाम समजून घेण्यासाठी ज्याकडून समजून घेणार तो मुसलमान असला पाहिजे किंवा मुस्लिम त्याचे नातेवाईक असले पाहिजेत. अशी दोन नावं आहेत महेद्रपाल आर्य(मेहबूब अली) आणि अन्वर शेख. त्यांचं साहित्य वाचल्यानंतर मला समजलं की इस्लाम निर्माण करण्यात आला तो मुळी अरबांच्या उत्थानासाठी आणि अरबांचं वर्चस्व रहावं म्हणून. याचाचअर्थ संभाजीनं मुस्लिम होणं म्हणजेच संभाजीनं औरंगजेबाचा 'मंडलिक' होणं. आणि संभाजीराजांना हे माहित असल्यानेच त्यांनी मरण स्विकारलं पण इस्लाम‌ नाही.
लक्षपूर्वक वाचल्याबद्दल आभार आणि धन्यवाद!

No comments: