(भारतीय तत्वज्ञानात जीवमात्रांमधे असणारे षड्रिपू(सहा शत्रू) सांगितले आहेत. त्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न मी या लेखमालेत करणार आहे).
भारतीय तत्वज्ञानात सांगितलेल्या षड्रिपूत ३रा आहे लोभ! कामाप्रमाणे हाही मेल्यानंतरही असतो. लोभ म्हणजे हाव आणि संग्रहवृत्ती(कंजूसपणा). हा रिपू असणं{माझ्या मते) आवश्यक नसलं तरी तो असतोच हे सत्य आहे.
आज जगापुढे ज्या समस्या आहेत त्याचं कारण लोभच आहे छद्म(व्यावहारिक) धनाच्या लोभापायी सध्या मानववंश राक्षसं होऊन भूमाता, निसर्गदेवता यांचं शोषण करत आहे(अलिकडे त्याला विकास हे गोंडस नाव दिलं आहे).लोभामुळे पृथ्वी एक दिवस 'निर्जीव' होईल की काय अशी भिती वाटत आहे.
यला वाटतं इतकं पुरेसं आहे.
लक्षपूर्वक वाचणाऱ्यांचे आभार आणि धन्यवाद!
No comments:
Post a Comment