Wednesday, September 17, 2025

ओळख षड्रिपूंची: काम!

(भारतीय तत्वज्ञानात जीवमात्रांमधे असणारे षड्रिपू(सहा शत्रू) सांगितले आहेत. त्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न मी या लेखमालेत करणार आहे.)
भारतीय तत्वज्ञानात सांगितलेल्या षड्रिपूत १ला आहे काम! खरं तर काम हा असा शत्रू आहे की जो जीवाच्या जन्मा अगोदरपासून तर असतोच असतो पण मेल्यानंतरही असतो(असा माझा विश्वास आहे). या कामाची ओळख आपण करून घेऊ.
आपण सर्वांचा जन्म हा कामातूनच झालेला आहे. मग तो काम कधी पुत्राचा किंवा कन्येचा असेल किंवा 'क्षणिकही' असेल. पण जग 'चालण्यासाठी काम आवश्यक आहे हे (काही जणांसाठी)कटू असलं तरी सत्य आहे. त्यामुळे कामाचं 'निर्मूलन करण सर्वसामान्यच नव्हे तर ऋषिमुनिंनाही शक्य नाही(कामाचं निर्मूलन करावं अशी 'कामना' करणं हाही एक काम आहे हाही एक भाग आहेच). 
तर बुद्धिवंताच्या आता लक्षात आलं असेलच की काम हा आत्म्याप्रमाणेच अनादी=अनंत आहे. पण अनियंत्रित काम(ना) शत्रू आहे. तो तुमचाच नाही तर पूर्ण वंशाचा ही नाश करू शकतो. म्हणून काम नष्ट नाही पण नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करत राहिलं पाहिजे. माझं घर मोठं असावं, वाहन आरामदायी असावं ह्या कामासाठी जीवन खपवू नये.
मला वाटतं काम या रिपूची एवढी ओळख पुरेशी आहे.
लक्ष देऊन वाचणाऱ्यांचे आभार आणि धन्यवाद!

No comments: